Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा महिनाभरातील उच्चांक

By admin | Updated: October 8, 2015 05:04 IST

जगभरातील वाढती खरेदी आणि आगामी लग्नाचा मोसम ध्यानात घेता स्थानिक जवाहिऱ्यांनी चालविलेली खरेदी यामुळे सोन्याने आज १० ग्रॅममध्ये २०० रुपयांनी उसळी

नवी दिल्ली : जगभरातील वाढती खरेदी आणि आगामी लग्नाचा मोसम ध्यानात घेता स्थानिक जवाहिऱ्यांनी चालविलेली खरेदी यामुळे सोन्याने आज १० ग्रॅममध्ये २०० रुपयांनी उसळी घेत महिनाभरातील २६,८५० असा उच्चांकी भाव गाठला. चांदीनेही सलग तिसऱ्या दिवशी आगेकूच करीत किलोमागे ५०० रुपयांची झेप घेत ३७,२५० रुपये असा दर गाठला.यंदा अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविण्याची शक्यता नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जगभरात सोन्याला मागणी वाढली आहे. जागतिक स्तरावर लंडन येथे सोने ०.१२ टक्क्यांनी वाढून १,१४९.०० अमेरिकी डॉलर प्रती औंस झाले.चांदीच्या नाण्यांचे भाव १५०० रुपयांनी वाढले. चांदीच्या १०० नाण्यांच्या खरेदीचा भाव ५२,५०० रुपये, तर विक्रीचा दर ५३,५०० रुपये होता. सणासुदीच्या काळात सोने-चांदी आणखी वाढू शकते, असे सूत्रांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)