Join us
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक उत्पादन उच्चांकी पातळीवर

By admin | Updated: December 11, 2015 23:56 IST

दिवाळीतील खरेदीमुळे ग्राहकोपयोगी आणि भांडवली वस्तुंचे उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याने आॅक्टोबरमध्ये औद्योगिक चक्र लक्षणीयदृष्ट्या गतीमान झाले.

नवी दिल्ली : दिवाळीतील खरेदीमुळे ग्राहकोपयोगी आणि भांडवली वस्तुंचे उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याने आॅक्टोबरमध्ये औद्योगिक चक्र लक्षणीयदृष्ट्या गतीमान झाले. आॅक्टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात ९.८ टक्क्यांची वाढ झाली असून हा पाच वर्षातील उच्चांकआहे.आॅक्टोबरमधील औद्योगिक उत्पादन निर्देशांक अत्यंत चांगला आहे. औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ मोठी आणि उत्साहवर्धक आहे. या आकडेवारीचा अर्थ लावण्यात थोडी काळजी घ्यायला हवी. कारण हा दिवाळीचा प्रभाव आहे, असे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी पत्रकारांना सांगितले.आॅक्टोबर २०१० मध्येही औद्योगिक उत्पादन निर्देशांक ११.३६ टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कारखाना क्षेत्रात १०.६ टक्के वाढ झाली आहे.