Join us  

‘झी एन्टरटेनमेन्ट’ला हायकोर्टाचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 2:59 AM

झी एन्टरटेनमेन्टला दिलासा देताना दिल्ली उच्च न्यायालयाने आयडीबीआय ट्रस्टीशिप आणि फ्रँकलिन टेम्पल्टन यांच्याकडील झीचे ७४० दशलक्ष रुपये किमतीचे गहाण समभाग विकण्यास स्थगिती दिली आहे.

नवी दिल्ली : झी एन्टरटेनमेन्टला दिलासा देताना दिल्ली उच्च न्यायालयाने आयडीबीआय ट्रस्टीशिप आणि फ्रँकलिन टेम्पल्टन यांच्याकडील झीचे ७४० दशलक्ष रुपये किमतीचे गहाण समभाग विकण्यास स्थगिती दिली आहे.न्या. राजीव सहाय एंडलॉ आणि न्या. आशा मेनन यांच्या पीठाने हा निर्णय दिला. एक सदस्यीय पीठाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध झीची धारक कंपनी कायक्वेटर मीडिया सर्व्हिसेसने अपील केले होते. अ‍ॅड. विजय अग्रवाल यांनी कंपनीच्या वतीने अपील केले. अंतरिम स्थगिती मागण्याचा कंपनीला हक्क आहे. तथापि, तो नाकारण्यात आला,असा युक्तिवाद कंपनीच्या वतीने अ‍ॅड नीरज किशन कौल यांनी केला. आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसने गहाण समभाग विकल्यासम्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना फटका बसू शकतो. समभागांच्या किमती घसरून कधीच भरून न येणारी हानी होऊ शकते, असेही कौल यांनी म्हटले.

टॅग्स :झी टीव्हीव्यवसायन्यायालय