Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो २ -मॉर्गन त्रावासो शिवसेनेत

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

मांद्रे : हरमल येथील उद्योजक मॉर्गन त्रावासो यांनी शिवसेनेचे आमदार व महाराष्ट्राचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी केसरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या वेळी शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क प्रमुख प्रदीप बोरकर, गोवा राज्य प्रमुख ॲड. अजितसिंग राणे, उपराज्यप्रमुख सुदेश भिसे, उत्तर जिल्हा प्रमुख आनंद शिरगावकर, स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस सुनील आर्लेकर व कार्यकर्ते उपस्थित होते. गोवा शिवसेनेच्या पणजी येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्रावासो यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. शिरगावकर यांनी सूत्रसंचालन केले व उपराज्यप्रमुख सुदेश भिसे यांनी आभार मानले.
फोटो : १) युवा उद्योजक मॉर्गन त्रावासो यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर स्वागत करताना महाराष्ट्राचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर. बाजूस प्रदीप बोरकर व मान्यवर.
(लक्ष्मण ओटवणेकर) २२०४-एमएपी-१०, ११