Join us

हॅलो २ -हणखणेत अनियमित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2015 01:21 IST

हणखणे : हणखणे भागात सध्या दिवसरात्र वीजपुरवठा खंडित असतो. खंडित विजेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सद्यस्थितीत उन्हामुळे हवेतील उष्मा कमालीचा वाढला असून पंख्याविना घरात थांबणे अवघड बनले आहे. रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात उकाडा सहन करावा लागत असल्याने तसेच मच्छरांचा त्रास होत असल्यामुळे नागरिकांना जागरण करावे लागत आहे. अनियमित वीजपुरवठ्याबाबत वीज खात्याशी संपर्क साधूनही अपेक्षित समाधान होत नसल्यामुळे नागरिक नाराज आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी असे प्रकार दररोज चालू असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. (प्रतिनिधी)