Join us

हॅलो १ : काँग्रेस गड राखणार की पुन्हा अपक्षाची बाजी?

By admin | Updated: May 5, 2015 01:20 IST

तुकाराम गोवेकर

तुकाराम गोवेकर
नावेली

काँगे्रसचा बालेकिल्ला राहिलेल्या नावेली मतदारसंघाला गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांनी शह दिला होता. त्यापूर्वीच्या निवडणुकीत सेव्ह गोवातर्फे चर्चिल आलेमाव यांनी नावेलीचा बेताज बादशहा असलेले लुईिझन फालेरो यांना धूळ चारली होती. सलग दोन निवडणुकांत काँग्रेसचा या मतदारसंघात पाडाव झाल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेस एकेकाळचा हा बालेकिल्ला शाबूत ठेवील की पुन्हा हा मतदारसंघ अपक्षाच्या बाजूने कौल देईल हे पाहणे मनोरंजक ठरेल. एकीकडे चर्चिल आलेमाव पुन्हा नावेलीतून निवडणूक लढवू शकतात. आलेमाव यांचा सध्याचा कल बघितल्यास ते बाणावली वा नावेलीतून निवडणूक लढविणार असे चित्र सासष्टीत आहे. त्यातच लुईिझन फालेरोही कमबॅक करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आवेर्तान यांची डोकेदुखी वाढू शकते. माजी मुख्यमंत्री लुईिझन फालेरो या मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आले. माजी सार्वजनिक बांधकाममंंत्री चर्चिल आलेमाव याच मतदारसंघातून सेव्ह गोवा पक्षातर्फे एक वेळा निवडून आले होते. त्यानंतर २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला नाकारून भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांना निवडून दिले. या मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार फालेरो यांचा कोणत्याही स्थितीत पाडाव करण्याचा चंग बांधून चर्चिल आलेमाव निवडून आले. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारावर घराणेशाहीचा आरोप केल्याने आलेमाव कुटुंबीयांचा पराभव झाला. त्यात चर्चिल आलेमाव यांचाही समावेश होता. फालेरो यांचा पराभव करून आलेमाव निवडून आल्यानंतर आठ वर्षे फालेरो गोव्याबाहेर होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना आसाम, मेघालय व मणिपूर या राज्यांचे प्रभारी बनवले होते. आता फालेरो यांच्याजवळ पुन्हा एकदा गोव्याची जबाबदारी दिली आहे. ते आता प्रदेशाध्यक्ष आहेत. २०१२च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ ९ जागा मिळाल्या होत्या.
चर्चिल आलेमाव या वेळी बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. नावेली मतदारसंघातून ते आपला उमेदवार म्हणून दक्षिण गोवा जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोज (सिप्रू) यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. ते चर्चिल यांचे क˜र समर्थक मानले जात असून नावेली मतदारसंघातून जिल्हा पंचायत निवडणुकीत सलग दोनवेळा निवडून आले आहेत.
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार व कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो हे येणार्‍या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यांना निवडून येण्यासाठी भाजपचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे; कारण जिल्हा पंचायत निवडणुकीत दवर्ली मतदारसंघातून भाजपचे उल्हास तुयेकर निवडून आलेत. या भागात भाजपचा प्रभाव थोडा जास्त आहे.

ढँङ्म३ङ्म : 0205-टअफ-06 - कॅप्शन: लुईिझन फालेरो. ढँङ्म३ङ्म : 0205-टअफ-07- कॅप्शन: चर्चिल आलेमाव. ढँङ्म३ङ्म : 0205-टअफ-08- कॅप्शन: आवेर्तान फुर्तादो