Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार खरेदीमुळे सोने पोहोचले २६ हजारांच्या वर

By admin | Updated: January 8, 2016 03:05 IST

जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे गुरुवारी ४३० रुपयांनी सोने वधारले.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे गुरुवारी ४३० रुपयांनी सोने वधारले. चालू वर्षी एकाच दिवसात झालेली सोन्याची ही सर्वोच्च दरवाढ आहे. परिणामत: सोन्याचे भाव २६,३३० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याने गाठलेला हा सर्वोच्च स्तर आहे.सोन्याप्रमाणेच चांदीचे भावही वाढले. औद्योगिक प्रकल्प आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदी २५० रुपयांनी वधारून ३४,००० रुपये प्रति किलो झाली. जागतिक बाजारात सोन्याचे भाव १,१०० अमेरिकी डॉलर प्रति औंस झाले.सिंगापुरात सोन्याचे भाव ०.८ टक्क्यांनी वाढून १,१०२.८५ अमेरिकी डॉलर प्रति औंस झाले. ६ नोव्हेंबरनंतरचा सोन्याचा सर्वोच्च दर आहे. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव ४३० रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,३३० रुपये आणि २६,१८० रुपये असे झाले. यापूर्वी १२ डिसेंबर रोजी सोन्याचे हे भाव होते. आजची ४३० रुपयांची दरवाढ पाहता गेल्या ४ दिवसांत सोन्याचे भाव ९१० रुपयांनी वाढले आहेत.चांदीच्या नाण्याचे भावही हजार रुपयांनी वाढले. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ४९ हजार रुपये होता.