Join us

‘एचडीएफसी’च्या सुकठणकर यांनी दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:58 IST

एचडीएफसी बँकेचे उप व्यवस्थापकीय संचालक परेश सुकठणकर यांनी राजीनामा दिला आहे.

मुंबई : एचडीएफसी बँकेचे उप व्यवस्थापकीय संचालक परेश सुकठणकर यांनी राजीनामा दिला आहे. सुकठणकर २०२० मध्ये बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांची जागा घेतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्याचे नेमके कारण कळू शकलेले नाही. सुकठणकर हे १९९४ मध्ये बँकेत रुजू झाले होते. मार्च २०१७ मध्ये त्यांची यापदी नियुक्ती झाली होती.