Join us
Daily Top 2Weekly Top 5

हातमाग प्रदर्शन उद्यापासून

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST


वाणिज्य बातमी १० बाय ३ ...

फोटो आहे.. रॅपमध्ये ..
कॅप्शन : प्रदर्शनाची माहिती देताना वस्त्रोद्योग विभागाचे संचालक रिचा बागला, बाजूला सहव्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर बावणे व मार्केटिंग प्रमुख विजय निमजे.

- हातमाग वस्त्रांवर २० टक्के सूट : १५ मार्चपर्यंत आयोजन

नागपूर : राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन २१ फेब्रुवारीपासून कस्तूरचंद पार्कवर करण्यात येणार असून उद्घाटन २१ रोजी रात्री ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे संचालक व राज्य हातमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रिचा बागला यांनी दिली.
अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री डॉ. विजय देशमुख यांच्यासह खासदार विजय दर्डा, अविनाश पांडे, अजय संचेती, आमदार राजेंद्र मुळक, नागो गाणार, अनिल सोले, प्रकाश गजभिये, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त अनुपकुमार, विणकर सेवा केंद्र मुंबईचे संचालक मनोज जैन प्रामुख्याने उपस्थित राहतील.
हे प्रदर्शन १५ मार्चपर्यंत सकाळी १२ ते ९ या वेळात सुरू राहील. २४ राज्यातील अनुभवी कारागिरांचे ५४ स्टॉल राहणार आहे. गेल्या वर्षीच्या ४ कोटींच्या तुलनेत यंदा विक्रीत वाढ होईल. हॅण्डलूमवर २० टक्के सूट राहील. फूड झोनची व्यवस्था आहे. हातमागावर तयार झालेल्या साड्या, शर्ट, पॅन्ट, शाल, सलवार सूट, बेडशीट, टॉवेल आणि जॅकेट हे विशेष आकर्षण राहील. हातमागाचे कापड कसे तयार होते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी फॅशन शो होणार आहे.
पत्रपरिषदेत महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर बावणे व वरिष्ठ मार्केटिंग प्रबंधक विजय निमजे उपस्थित राहतील.