Join us
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीत आजपासून गुरूपौर्णिमा उत्सव -------------------------------

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

शिर्डी : साईंच्या इच्छेने व त्यांच्या हयातीतच १९०८ साली सुरू झालेल्या शिर्डीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे़ तीन दिवस चालणार्‍या उत्सवासाठी संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़

उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून पालख्या घेऊन पदयात्री शिर्डीत दाखल होत आहेत़ गुरूवारी पहाटे साईप्रतिमा, ग्रंथ, वीणा यांच्या मिरवणुकीने उत्सव सुरू होईल. पुण्यातील साईबाबा पालखी सोहळ्याचे यंदा सत्ताविसावे वर्ष असून त्यांचा रौप्य रथ बुधवारी साईनगरीत दाखल झाला़
साईभक्तांसाठी संस्थानने सुमारे अडीचशे क्विंटल साखरेचे लाडू बनवले आहेत़ (प्रतिनिधी)
---------