Join us

महावितरणचा पदभार गुप्तांनी स्वीकारला

By admin | Updated: January 7, 2015 23:37 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार ओ.पी.गुप्ता यांनी नुकताच स्वीकारला. अजय मेहता यांच्याकडून त्यांनी नव्या पदाची सुत्रे स्वीकारली.

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार ओ.पी.गुप्ता यांनी नुकताच स्वीकारला. अजय मेहता यांच्याकडून त्यांनी नव्या पदाची सुत्रे स्वीकारली. यापूर्वी गुप्ता हे बेस्टचे महाव्यवस्थापक होते. मॅकेनिकल इंजिनियरिंग विषयात पदवी घेतलेले ओ.पी.गुप्ता हे १९९२ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या (आयएएस) तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी, त्यांनी एस.टी. महामंडळ, महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, अमरावती व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच अकोला जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर काम केले आहे. (प्रतिनिधी)