Join us

जीएसटी आणखी कमी होणार!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 03:47 IST

वस्तू आणि सेवा कराची व्याप्ती वाढण्याची आणि भविष्यात जीएसटीचे दर आणखी कमी होण्याचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. करप्रणालीची व्याप्ती वाढवणे याचा अर्थ पेट्रोल व डिझेल यांना जीएसटीखाली आणणे असा लावला जात आहे.

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराची व्याप्ती वाढण्याची आणि भविष्यात जीएसटीचे दर आणखी कमी होण्याचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. करप्रणालीची व्याप्ती वाढवणे याचा अर्थ पेट्रोल व डिझेल यांना जीएसटीखाली आणणे असा लावला जात आहे. जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत त्यावर चर्चा होईल, असे जेटली यांनी यापूर्वीच सांगितले आहे.पेट्रोल व डिझेल यांना जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. तेल व वायू मंत्रालयानेही तशी इच्छा व्यक्त केली आहे. तसे प्रत्यक्ष घडल्यास पेट्रोलजन्य वस्तूंच्या किमती खूपच कमी होतील. मात्र अनेक राज्यांनी त्यास विरोध केला आहे.जीएसटी लावल्यास व्हॅटमुळे मिळणारे उत्पन्न कमी होईल, अशी राज्यांची भीती आहे.

टॅग्स :जीएसटीनवी दिल्ली