Join us  

GST: जीएसटीच्या वार्षिक रिटर्नचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 6:20 AM

GST: आर्थिक वर्ष २०२०-२१च्या जीएसटी वार्षिक रिटर्नचा तपशील फॉर्म जीएसटीआर-९ आणि फॉर्म जीएसटीआर-९सी मध्ये नवीन काय बदल करण्यात आला आहे?

- - उमेश शर्मा(चार्टर्ड अकाउण्टण्ट) अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आर्थिक वर्ष २०२०-२१च्या जीएसटी वार्षिक रिटर्नचा तपशील फॉर्म जीएसटीआर-९ आणि फॉर्म जीएसटीआर-९सी मध्ये नवीन काय बदल करण्यात आला आहे? कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, अधिसूचना क्रमांक ३०/२०२१ तारीख ३० जुलै २०२१  च्या सीजीएसटी नियम २०१७ नुसार या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. हे नियम ०१ ऑगस्ट २०२१ पासून लागू होतील. काही महत्त्वाचे बदल यात घडवून आणले आहेत.अर्जुन : जीएसटीआर-९ (जीएसटी वार्षिक रिटर्न) आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोणाला दाखल करावा लागेल? कृष्ण :  प्रत्येक नोंदणीकृत व्यक्ती ज्याची आर्थिक वर्षाची उलाढाल ही २ कोटींपेक्षा जास्त आहे त्यांनी जीएसटीआर-९ हा पुढील आर्थिक वर्षातील ३१ डिसेंबर या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे (म्हणजेच आर्थिक वर्ष २०२०-२१ चा वार्षिक तपशील ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भरावा.) कम्पोजिशन करदाता आणि ई-कॉमर्स ऑपरेटर यांनी जीएसटीआर-९ए आणि ९बी  दाखल करावे. आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल २ कोटींपेक्षा कमी असेल, त्यांना वार्षिक रिटर्न भरणे गरजेचे नाही. या आधी रिटर्न दाखल करण्यास पर्याय होता. हा एक प्रमुख बदल केला आहे.अर्जुन : जीएसटीआर-९सी मध्ये काय बदल झाले आहेत? कृष्ण :  ज्यांची मागील आर्थिक वर्षातील उलाढाल ५ कोटींपेक्षा जास्त होती, असे करदाते जीएसटीआर-9सी  दाखल करतील. पूर्वी जीएसटी ऑ‍डिट हे चार्टर्ड अकाउंटंटकडुन प्रमाणित करावे लागत होते; परंतु आता त्यांची गरज भासणार नाही, कारण आता करदात्याने स्वत:च कर देयाचे रिकन्सीलिएशन करायचे आहे आणि ते स्वत:च प्रमाणित करून पुढील आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत दाखल करायचे आहे.अर्जुन :  करदात्याने जीएसटीआर-९ आणि 9सी दाखल करताना काय लक्षात घ्यावे? कृष्ण :  करदात्याने आता स्वत:च प्रमाणित केलेले जीएसटीआर-9सी हे कर देयकाच्या रिकन्सीलिएशन सोबत घ्यावे आणि तसेच जीएसटीआर-९सी केव्हा लागू होईल याची नोंद घ्यावी. आता करदात्यांना स्वत:हून ही काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :जीएसटीव्यवसाय