Join us  

सरकारी तिजोरीसाठी चांगली बातमी! जुलैमध्ये १.६५ लाख कोटी रुपये GST कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 7:26 PM

जीएसटी संकलनाच्या दृष्टीने जुलै महिना चांगला राहिला आहे. जुलै महिन्यात जीएसटी संकलन १.६५ लाख कोटी रुपये झाले आहे. ही गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ११ टक्के अधिक आहे.

सरकारच्या तिजोरीसाठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी संकलनाच्या दृष्टीने जुलै महिना चांगला आहे. जुलै महिन्यात जीएसटी संकलन १.६५ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ११ टक्के अधिक आहे. अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू झाल्यापासून जीएसटी संकलनाने पाचव्यांदा १.६ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Adani चा सर्वात स्वस्त शेअर बनला रॉकेट, वाढतेय किंमत; BSE नं मागितलं स्पष्टीकरण

या संदर्भात वित्त मंत्रालयाने एक निवेदन जाहीर केले आहे. 'जुलै २०२३ मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन १,६५,१०५ कोटी रुपये होते. यामध्ये केंद्रीय GST २९,७७३ कोटी रुपये, राज्य GST  ३७,६२३ कोटी रुपये, एकत्रित GST ८५,९३०  कोटी रुपये यांचा समावेश आहे. याशिवाय, सेस ११,७७९ कोटी रुपये, ८४० कोटींसह होता, असं निवेदनात म्हटले आहे.

सरकारने जुलै महिन्यात सीजीएसटीसाठी ३९,७८५ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ३३,१८८ कोटी रुपयांचा तोडगा काढला आहे. नियमित सेटलमेंटनंतर जुलैनंतर केंद्र सरकारचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ६९,५५८ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ७०,८११ कोटी रुपये आहे.

देशांतर्गत व्यवहारातून महसुलात वार्षिक आधारावर १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्यात जीएसटी महसूल संकलन १,६१,४९७ कोटी रुपये होते.

टॅग्स :जीएसटीकर