Join us

राज्यसभेत जीएसटी विधेयक मंजूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 20:21 IST

करव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडविणाऱ्या वस्तू व सेवा कर विधेयकाला (जीएसटी) गुरुवारी राज्यसभेत मंजूरी मिळाली आहे. आता १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 06 - करव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडविणाऱ्या वस्तू व सेवा कर विधेयकाला (जीएसटी) गुरुवारी राज्यसभेत मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. 
केंद्रीय जीएसटी, एकिकृत जीएसटी, केंद्रशासित प्रदेश जीएसटी व राज्यांना मिळणाऱ्या जीएसटी नुकसान भरपाईचे विधेयक अशी चार विधेयके आज राज्यसभेत मंजूर करण्यात आली. राज्यसभेत जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, जीएसटी विधेयक लागू करण्यास काही हरकत नाही. या विधेयकायच्या मंजूरीचे श्रेय सर्वांना जाते.
एका व्यक्तीला किंवा एका सरकारला या विधेयकाचे श्रेय घेता नाही, असेही ते म्हणाले.  
गेल्या महिन्यात लोकसभेत या जीएसटी विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती.   
(राज्यसभेत जीएसटीवर चर्चा)