Join us  

जीएसटी आॅडिट रिपोर्ट ३१ डिसेंबरपूर्वी दाखल करणे अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:45 AM

कृष्णा, जीएसटीमधील जीएसटीआर ९ सी हा कोणता फॉर्म आहे?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमधीलजीएसटीआर ९ सी हा कोणता फॉर्म आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटीअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या करदात्यांसाठी जीएसटीआर ९ सी हा वार्षिक आॅडिट फॉर्म आहे. करदात्यांसाठी करदात्याला आॅडिट रिपोर्टसह वार्षिक रिटर्न आणि रिकंसिलेशन स्टेटमेंट दाखल करावे लागेल.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर ९ सी कोणी दाखल करायला हवे आणि त्याची देय तारीख काय असेल?कृष्ण : अर्जुना, ज्या करदात्यांची आर्थिक वर्षातील उलाढाल २ कोटी रुपयांहून अधिक असेल, त्यांना जीएसटीआर ९ सी दाखल करणे अनिवार्य आहे. जुलै २०१७ ते मार्च २०१८चे जीएसटीआर ९ सी, ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत दाखल करावे. जीएसटी कायद्यांतर्गत जीएसटीआर ९ सी हे चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटव्दारे सर्टिफाइड करून घेणे अनिवार्य आहे.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर ९सी मध्ये करदात्याला कोणता तपशील द्यावा लागेल?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर ९ सी मध्ये भाग अ आणि भाग ब असे दोन आहेत. भाग अ मध्ये रिकंसिलेशन स्टेटमेंट आहे. त्यातही ५ भाग दिलेले आहेत. जसे की,भाग १ - मूलभूत तपशील.भाग २ - रिटर्नमध्ये घोषित केलेल्या आणि जीएसटीआर ९ मधील उलाढालीचे रिकंसिलेशन.भाग ३ - भरलेल्या कराचे रिकंसिलेशन.भाग ४ - इनपुट टॅक्स विवरणाचे रिकंसिलेशन.भाग ५ - रिकंसिलेशन न केल्यामुळे आलेल्या दायित्वाबद्दल आॅडिटरचा सल्ला आणि भाग ‘ब’ मध्ये सर्टिफिकेशन आहे.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर ९ सी वेळेवर दाखल केले नाही, तर लेट फी भरावी लागेल का?कृष्ण : अर्जुना, आॅडिट करून नाही घेतले, तर त्यासाठी केंद्राच्या सीजीएसटी कायद्यामध्ये लेट फी दिलेली नाही, परंतु प्रत्येक राज्याने एसजीएसटी कायद्यांतर्गत दंड लागू केला आहे. महाराष्ट्रातील सीजीएसटी कलम १२५ नुसार साधारण दंड लागू होईल. तो २५ हजार रुपये असू शकतो.>अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर ९सी दाखल करण्याची देय तारीख ही ३१ डिसेंबर आहे. सरकारने ती अजूनही वाढविलेली नाहीये. जीएसटी पोर्टलवर अद्यापही हा फॉर्म चालू झालेला नाहीये. यात अजूनही बदल होणार आहेत. अशी चर्चा होत आहे. सनदी लेखापालांना या वेळी व्हॅट आणि जीएसटी हे दोन्हीही आॅडिट करावे लागतील. देय तारखेमुळे सर्वांत जास्त धावपळ त्यांचीच होणार आहे. त्यामुळे आता आॅडिटमध्ये काय गोंधळ उडणार आहे, हे तर देवच जाणे!

टॅग्स :जीएसटी