Join us

कृषी उत्पादनात वाढ

By admin | Updated: August 4, 2016 03:37 IST

वहितीखालील जमिनीचे क्षेत्र काही प्रमाणात घटले असले तरी कृषी उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेत दिली.

नवी दिल्ली : वहितीखालील जमिनीचे क्षेत्र काही प्रमाणात घटले असले तरी कृषी उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेत दिली.राधामोहन सिंग यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, शेतजमिनींचा बिगर शेती वापर रोखण्यासाठी योग्य ते उपाय योजण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे. वहिताखालील जमीन वाढविण्यासाठी केंद्र सरकारही उपाययोजना करीतच आहे. कृषिमंत्री म्हणाले की, वहितीखालील जमीन काही प्रमाणात घटली असली तरी, देशातील कृषी उत्पादन सातत्याने वाढत आहे. दुष्काळ, महापूर आणि अन्य नैसर्गिक आपत्तींचा काळ वगळता अन्य वर्षांत उत्पादनात वाढच झाली आहे. २0१३-१४ या वर्षात वहितीखालील जमीन सरासरी १८१.७१३ दशलक्ष हेक्टरने कमी जाली आहे. २0११-१२ मध्ये ती १८२.२0९ दशलक्ष हेक्टरने कमी झाली होती. २0१0-११ च्या कृषी खानेसुमारीनुसार, २000-0१ या वर्षात शेतजमीन धारणेचे प्रमाण १.३३ हेक्टर होते. २0१0-११ मध्ये ते १.१५ हेक्टर होते. जमीन धारणा घटत असली तरी त्याचा उत्पन्नावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. उलट उत्पादनात वाढच होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)> सस्टेनेबल अ‍ॅग्रिकल्चरउत्पादन वाढावे यासाठी सरकार विविध योजना आणि कार्यक्रम राबवीत आहे. जमिनीची धूप होऊ नये तसेच जमिनीचा पोत बिघडू नये यासाठी सरकारने नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल अ‍ॅग्रिकल्चर (एनएमएसए) हाती घेतले आहे. या मिशनअंतर्गत सर्व प्रकारच्या जमिनी गरजेनुसार विकसित करण्यात येत आहेत. पडून असलेल्या जमिनी, नापीक जमिनी यांचा त्यामध्ये समावेश आहे. जलसंधारण व अन्य स्वरूपाचे उपाय करून या जमिनी लागवडीखाली आणण्यात येत आहेत.