Join us  

जीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 1:58 PM

जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देएसी हॉटेलमध्ये बसल्यानंतर लागणारा 18 टक्के जीएसटी 12 टक्के करण्याची शिफारस मंत्रिगटाने केली आहे. 

नवी दिल्ली - जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत. 

आसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर  28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. 

1 जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब जीएसटीमध्ये आहेत. जुलै महिन्यात हा कर लागू झाल्यानंतर 227 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत. ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे. एसी हॉटेलमध्ये बसल्यानंतर लागणारा 18 टक्के जीएसटी 12 टक्के करण्याची शिफारस मंत्रिगटाने केली आहे. 

टॅग्स :जीएसटी