Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणखेडा येथे भिंत कोसळून आजोबा-नातवाचा मृत्यू

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

नाशिक : नांदगाव तालुक्यातील रणखेडा येथे पावसामुळे घराची भिंत कोसळून आजोबासह नातवाचा मृत्यू झाल्याने ऐन बैल पोळा सण उत्सवास सुरुवात होतानाच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील रणखेडा येथे पावसामुळे घराची भिंत कोसळून आजोबासह नातवाचा मृत्यू झाल्याने ऐन बैल पोळा सण उत्सवास सुरुवात होतानाच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे रणखेडा गावातील सरीचंद लालचंद चव्हाण यांच्या घराची भिंत अचानक कोसळली. त्याचवेळेस स्वत: सरीचंद लालचंद चव्हाण (५८) हे खाटेवर बसून त्याच खाटेवर बांधलेल्या झोळीतील त्यांचा नातू सोमनाथ गोकूळ चव्हाण (वय ४ महिने) यास झोका देत होते. पावसाने भिजलेली भिंत अंगावर कोसळून आजोबा व नातू ढिगार्‍या खाली सापडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.(प्रतिनिधी)