Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझोड येथे ग्रामसभा

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

माझोड: अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या माझोड येथे ग्रामसभेत शनिवारी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवकाचा विषय स्थगित ठेवण्यात आला.

माझोड: अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या माझोड येथे ग्रामसभेत शनिवारी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवकाचा विषय स्थगित ठेवण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच निर्मला गणेश पांडे होत्या. उपसरपंच प्रल्हाद ताले, ग्रामसेविका मनोरमा पोटे, पोलीस पाटील शंकरराव ढोरे, ग्रामपंचायत सदस्य गोपाल काळे, मंगेश खंडारे, गणेश पांडे, देवानंद खंडारे, ज्ञानेश्वर सावरकर, साहेबराव खंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामसेवक हर्षानंद खंडारे हे अपंग असून, ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी देवानंद खंडारे, सदानंद खंडे यांच्यासह अनेकांनी केली. (वार्ताहर)