Join us  

सरकार 'बँक ऑफ इंडिया'सह ६ सरकारी बँकांमधील काही स्टेक विकण्याची शक्यता, काय आहे प्लॅन? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:11 AM

येणाऱ्या काळात काही सरकारी बँकांमधील आपला काही हिस्सा सरकार विकण्याच्या तयारीत आहे.

Bank Disinvestment: येणाऱ्या काळात काही सरकारीबँकांमधील आपला काही हिस्सा सरकार विकण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांमधील आपली काही भागीदारी विकण्याची योजना आखत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील ५ ते १० टक्के भागीदारी विकण्यावर विचार करत आहे. यासाठी डिटेल रोडमॅप तयार केला जातोय.या बँकांचा समावेशइकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, भविष्यात मोदी सरकार ८० पेक्षा जास्त इक्विटी असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँकांमधील १० टक्क्यांपर्यंत हिस्सा विकू शकते. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय की, सरकार लवकरच या बँकांमधील स्टेक विकण्यासाठी विस्तृत रोडमॅप तयार करेल. बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेत सरकारी मालकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे सरकार या बँकांमधील आपली हिस्सेदारी विकू शकते.काय आहे योजना?रिपोर्टनुसार सरकार या बँकांतील हिस्सा ऑफर फॉल सेल अंतर्गत विकू शकते. सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरच्या किंमतीतील वाढीचा फायदा घ्यायचा असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, सरकारी बँकांनी उत्तम कामगिरीसोबतच बँज लोनही कमी केलं, यामुळे त्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येते. गेल्या निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स ६.९ टक्क्यांच्या तुलनेत पीएसयू बँक इंडेक्समध्ये ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

टॅग्स :सरकारबँक ऑफ इंडियाबँक