Join us

सरकारची कामगिरी आश्चर्यकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:56 IST

 नरेंद्र मोदी सरकारची गेल्या चार वर्षांतील वृद्धी, चलनवाढ आणि आर्थिक तूट यासह वार्षिक वृद्धिदर, सकल राष्ट्रीय उत्पादन आदी सूक्ष्म आर्थिक निकषांतील कामगिरी आश्चर्यकारक असल्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारची गेल्या चार वर्षांतील वृद्धी, चलनवाढ आणि आर्थिक तूट यासह वार्षिक वृद्धिदर, सकल राष्ट्रीय उत्पादन आदी सूक्ष्म आर्थिक निकषांतील कामगिरी आश्चर्यकारक असल्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले. रविवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजीव कुमार म्हणाले की, संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कार्यकाळात देशाला धोरण लकवा झाला होता व तो गतिशून्य अवस्थेत गेल्यानंतर मोदी सरकारने सगळ्या आघाड्यांवर चांगली कामगिरी केली आहे. २६ मे, २०१४ रोजी मोदी पंतप्रधान बनले होते. २०१४ मध्ये अर्थव्यवस्था घसरली होती, बँकांचे वसूल न होणारे कर्ज (एनपीए) आधीच वाढलेले होते. त्यात भर पडली, ती धोरण लकव्याची. सरकारला तेव्हा मिळालेला हा आर्थिक वारसा होता. आज आम्ही ज्या स्थानावर आहोत, तेथे आम्ही या क्षणाला पोहोचलो आहोत, हे आश्चर्यजनक आहे.

टॅग्स :सरकारनिती आयोग