नवी दिल्ली : पाऊस सामान्य ते कमी होण्याचे भाकीत व्यक्त झाल्यानंतर सरकारने ५८० जिल्ह्यांसाठी आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याची योजना तयार केली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या भाकितानुसार अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सून सामान्य ते कमी असेल.यावर्षी मान्सूनचा पाऊस केरळमध्ये वेळेवर म्हणजे एक जून रोजी होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी देशात १२ टक्के कमी पाऊस झाला व त्याचा परिणाम धान्य, कापूस आणि तेलबियांच्या उत्पादनावर झाला.कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बलयान यांनी बुधवारी वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, आम्ही ५८० जिल्ह्यांमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहोत. याशिवाय सरकार शेतकऱ्यांसाठी नवी पीक विमा योजना तयार करीत आहे. मान्सून सामान्य ते कमी राहिल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकार राज्यांच्या मदतीने तोंड देईल.’’राज्य सरकारांनी कृषी विषयावर सल्ला देण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कमजोर मान्सूनचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज
By admin | Updated: May 14, 2015 00:22 IST