Join us

सरकारने सहाराला मागितले स्पष्टीकरण

By admin | Updated: December 25, 2015 01:26 IST

सरकारने सहारा ग्रुप के्रडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीला स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत कंपनीने आतापर्यंत काही उत्तर दिलेले नाही.

नवी दिल्ली : सरकारने सहारा ग्रुप के्रडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीला स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत कंपनीने आतापर्यंत काही उत्तर दिलेले नाही. कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सहाराकडून आम्ही १२ प्रकरणात स्पष्टीकरण मागितले आहे. सहाराचे एजंट आपल्या गुंतवणूकदारांना आपले पैसे सहाराच्या जुन्या गुंतवणूक योजनेतून नव्या के्रडिट को. आॅप.योजनेमध्ये स्थानांतरित करण्यासाठी दबाव आणत आहेत. या सोसायटीची स्थापना २०१० ची आहे. सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि अन्य दोन वरिष्ठ अधिकारी मागील २० महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत.