Join us  

सरकारच्या बूस्टरचे बाजाराकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 6:10 AM

जोरदार खरेदीमुळे सकाळी निर्देशांक १४०० अंशांनी उसळला होता. नंतर मात्र त्याला काही प्रमाणात विक्रीचा फटका बसला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीने ९३०० अंशांचा टप्पा ओलांडला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने दिलेल्या पॅकेजचे बाजाराने उत्साहामध्ये स्वागत केले आहे. जोरदार खरेदीमुळे सकाळी निर्देशांक १४०० अंशांनी उसळला होता. नंतर मात्र त्याला काही प्रमाणात विक्रीचा फटका बसला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीने ९३०० अंशांचा टप्पा ओलांडला आहे.बुधवारी बाजार खुला झाला तोच मुळी सुमारे १४७५ अंशांच्या वाढीने ! त्यानंतर काही प्रमाणात विक्रीचा दबाव आला आणि निर्देशांक काहीसे खाली आले. असे असले तरी दिवसअखेर संवेदनशील निर्देशांक ६३७.४९ अंशांनी वाढून ३२,००८.६२ अंशांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टीनेही ९३०० अंशांची पातळी ओलांडली आहे. दिवसअखेरीस तो ९,३८३.५५ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये १८७ अंशांची वाढ झाली आहे.बँकांच्या समभागांना मोठी मागणी दिसून आली. अ‍ॅक्सिस बॅँकेचे समभाग ७ टक्क्यांनी वधारले. याबरोबरच अल्ट्राटेक, एल अ‍ॅण्ड टी, आयसीआयसीआय बँक, महिंद्र, बजाज फायनान्समध्ये वाढ झाली.

टॅग्स :शेअर बाजारमुंबई