Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुगलची वायरलेस सेवा आणणार दूरसंचार स्वस्ताई

By admin | Updated: April 23, 2015 23:23 IST

गुगल स्वस्त सेवा देताना वायरलेस फोन उद्योगाला धक्का द्यायचा प्रयत्न करीत आहे. यामुळे फोन सेवा देणाऱ्या प्रमुख कंपन्यांवर आॅनलाईन आणि गुगलच्या

सॅन फ्रॅन्सिस्को : गुगल स्वस्त सेवा देताना वायरलेस फोन उद्योगाला धक्का द्यायचा प्रयत्न करीत आहे. यामुळे फोन सेवा देणाऱ्या प्रमुख कंपन्यांवर आॅनलाईन आणि गुगलच्या सेवेचा उपयोग स्वस्तात करण्यासाठी दडपण असेल.गुगलने बुधवारी ‘प्रोजेक्ट फाई’ सादर केला. स्मार्टफोनला वायरलेस जोडणी (कनेक्शन) सेवा देणाऱ्या या प्रकल्पाची घोषणा गुगलने दोन महिन्यांपूर्वी केली होती. गुगल इंक आधारभूत फोन सेवा २० डॉलर दरमहा या दराने उपलब्ध करून देणार आहे. ग्राहकांकडून एकरकमी पैसे घेण्याऐवजी दर महिन्याला जेवढ्या सेल्यूलर डाटाचा वापर होईल तेवढेच पैसे आता गुगल घेईल. एक जीबी इंटरनेटसाठी १० डॉलर घेतले जातील. (वृत्तसंस्था)