Join us

वस्तू - सेवा कराचे कार्यालय दिल्लीत

By admin | Updated: August 16, 2015 22:08 IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक संसदेत अडकून पडले असले तरी मोदी यांच्या सरकारने सेवा कर महासंचालनालयाचे नामांतर वस्तू आणि सेवा

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक संसदेत अडकून पडले असले तरी मोदी यांच्या सरकारने सेवा कर महासंचालनालयाचे नामांतर वस्तू आणि सेवा कर महासंचालनालय (डीजीजीएसटी) असे केले असून त्याचे कार्यालय मुंबईतून दिल्लीत हलविले आहे.अप्रत्यक्ष करांसाठी धोरण ठरविणाऱ्या सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अँड कस्टम्स या सर्वोच्च मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार हे नामांतर १ आॅगस्ट २०१५ पासून झाले आहे, असे अर्थ मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. वस्तू आणि सेवा कर हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सगळ्यात मोठा सुधारणांचा कार्यक्रम समजला जातो.इराणी चहा... हैदराबाद शहरातील एका हॉटेलात इराणी चहा तयार करताना एक कारागीर. हैदराबादेत १९४0 पासून इराणी चहाची परंपरा आहे. प्राचीन पर्शियामधून आलेल्या विस्थापितांनी गुजरातमार्गे मुंबई, पुणे असा प्रवास करून हैदराबाद गाठले. हैदराबादेत त्यांची अनेक हॉटेल्स आहेत. इराण्यांची हॉटेल म्हणून ही प्रसिद्ध आहे. या हॉटेलांतील चहा लोकप्रिय असून, सुमारे १0 ते १२ रुपयांना तो मिळतो.