Join us  

खूशखबर... पेट्रोल-डिझेलचे भाव सलग सातव्या दिवशी घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 9:05 AM

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर सलग सातव्या दिवशी घसरले आहेत

नवी दिल्ली देशातील पेट्रोल-डिझेलचे दर सलग सातव्या दिवशी घसरले आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांना छोटासा का होईना, दिलासा मिळाला आहे. मागच्या एका आठवड्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कपात होताना दिसत आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे. मागच्या सात दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होत आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोल 80.6 रुपये प्रति लीटर तर डिझेल 66.81 रुपये प्रति लीटर आहे.  11 मार्चला दिल्लीमध्ये पेट्रोल 72 रुपये 48 पैसे होतं. एका आठवड्यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर 72 रुपये 19 पैसे आहेत. म्हणजेच पेट्रोलच्या किंमतीमध्ये 29 पैशांची कपात झाली आहे. 

पेट्रोलबरोबरच डिझेलच्या किंमतीही कपात झाली आहे. गेल्या आठवड्यात राजधानी नवी दिल्लीमध्ये डिझेलचे भाव 62 रुपये 89 पैसे प्रति लीटर होते. आज दिल्लीमध्ये डिझेल 62 रुपये 73 पैसे प्रती लीटर आहेत. म्हणजेच एका आठवड्यामध्ये डिझेलचे भाव 16 पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या डिझेल 66.81 रुपये प्रति लीटर आहे. 

टॅग्स :पेट्रोल