Join us  

Paytm वापरकर्त्यांसाठी खूशखबर, कंपनीनं केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 6:18 PM

नवी दिल्लीः ई-वॉलेट कंपनी असलेल्या पेटीएमनं ग्राहकांना एक खूशखबर दिली आहे. आता डिजिटल ट्रान्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त चार्ज द्यावं लागणार ...

नवी दिल्लीः ई-वॉलेट कंपनी असलेल्या पेटीएमनं ग्राहकांना एक खूशखबर दिली आहे. आता डिजिटल ट्रान्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त चार्ज द्यावं लागणार नाही. तत्पूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं होतं की, क्रेडिट कार्डाच्या व्यवहारावर 1 टक्के, डेबिट कार्डाच्या व्यवहारावर 0.9 टक्के आणि नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या ट्रॉन्झॅक्शनवर 12 ते 15 टक्क्यांचं शुल्क ग्राहकांना भरावं लागणार आहे. त्यानंतर कंपनीनं स्पष्टीकरण देत अशी कोणतीही योजना नसल्याचं सांगितलं आहे.मीडियामध्ये सुरू असलेल्या वृत्ताचं पेटीएमनं पूर्णतः खंडन केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं 2 हजार रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन व्यवहारावरचे चार्जेस स्वतः देणार असल्याचं सांगितलं होतं. डेबिट कार्ड्स, भीम, यूपीआयसारख्या पेमेंट्स यंत्रणेसाठी हे नियम लागू आहेत. काय आहे प्रकरण- मीडिया रिपोर्ट्नुसार पेटीएम मर्चेंट डिस्काऊंट रेट (एमडीआर)चा भार ग्राहकांवर टाकण्याच्या विचारात आहे. क्रेडिट कार्डाच्या व्यवहारावर 1 टक्के, डेबिट कार्डाच्या व्यवहारावर 0.9 टक्के आणि नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या ट्रॉन्झॅक्शनवर 12 ते 15 टक्क्यांचं शुल्क ग्राहकांना भरावं लागणार आहे. परंतु पेटीएमनं हे वृत्त फेटाळलं आहे.  

काय असतो एमडीआर चार्जेस- बँक आणि कंपन्या डिजिटल व्यवहारावर एमडीआर आकारतात. एमडीआर म्हणजे दुकानदार डेबिट किंवा क्रेडिट कार्डानं व्यवहार करताना आकारत असलेलं अतिरिक्त शुल्क असतं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ते डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर आकारण्यात येणारं अतिरिक्त शुल्क आहे. सध्या हे चार्जेस पेटीएमला भरावे लागतात. 

टॅग्स :पे-टीएम