Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लेअर पेन्स’चे सुवर्ण महोत्सवी वर्ष

By admin | Updated: October 6, 2016 06:09 IST

प्रसिद्ध पेन उत्पादक कंपनी ‘फ्लेअर पेन्स लिमिटेड’ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. १९६७मध्ये व्यवसायाला सुरुवात केल्यापासून कंपनीने

मुंबई : प्रसिद्ध पेन उत्पादक कंपनी ‘फ्लेअर पेन्स लिमिटेड’ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. १९६७मध्ये व्यवसायाला सुरुवात केल्यापासून कंपनीने एक दीर्घ यशस्वी प्रवास केला आहे. फ्लेअर पेन्स लिमिटेड ही लेखन उद्योगातील महत्त्वाची कंपनी आहे. पॅरि-कार्डिन (फ्रान्स) आणि पँटेल (जपान) यांच्यासह लेखन सामुग्री उद्योगात अग्रणी असलेल्या कंपन्यांबरोबर फ्लेअरने संयुक्त सहकार्यातून करार केला आहे. रुडी केल्नर, लँडमार्क आणि फ्लेअर हे कंपनीचे इन-हाउस ब्रँड आहेत. अलीकडेच कंपनीने लेखन सामुग्री क्षेत्रात आघाडीवर असलेला हौसर हा जर्मनीचा ब्रँड खरेदी केला. १९३५ मध्ये स्थापन झालेली हौसर ही युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठेतील लोकप्रिय कंपनी आहे.मुंबई, दमण, डेहराडून आणि सुरत (विशेष आर्थिक विभाग) हे सर्व उत्पादन प्रकल्प जवळपास सहा लाख चौरस फूट जागेवर उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे फ्लेअरची प्रतिदिन ५ दशलक्ष प्लॅस्टिक पेन्स आणि १ लाख मेटल पेन्सचे उत्पादन करण्याची स्थापित क्षमता आहे. फ्लेअरमध्ये ४००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असून, त्यामध्ये २८०० महिलांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)