Join us

सोने ३० हजारांच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: April 22, 2016 02:49 IST

लग्नाचा मोसम ध्यानात घेऊन सराफांनी केलेली खरेदी, तसेच जागतिक बाजारात असलेला उठाव यामुळे सोने गुरुवारी ४०० रुपयांनी वधारून २९,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.

नवी दिल्ली : लग्नाचा मोसम ध्यानात घेऊन सराफांनी केलेली खरेदी, तसेच जागतिक बाजारात असलेला उठाव यामुळे सोने गुरुवारी ४०० रुपयांनी वधारून २९,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. चांदीही २४०० रुपयांनी महागून ४०,९०० रुपये प्रति किलो झाली. चांदीचा गेल्या पावणेतीन वर्षात एकाच दिवसात वाढलेला हा सर्वोच्च भाव आहे.राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या बाजारात ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव ४०० रुपयांनी वाढून ते अनुक्रमे २९,९०० रुपये आणि २९,७५० रुपये प्रति ग्रॅम झाले.अमेरिकी फेडरल बँक इतक्यात व्याजदर वाढविण्याची शक्यता नाही. त्यामुळे परदेशातही गुंतवणूकदारांनी सोन्यातच सुरक्षित गुंतवणूक समजली. त्यामुळे परदेशातही सोन्याला चांगला उठाव मिळाला. सिंगापुरात सोने १.०३ टक्क्यांनी वधारून १२५७.१० डॉलर प्रति औंस, तर चांदी २.७२ टक्क्यांनी वधारून १७.४० डॉलर प्रति औंस झाली. सोन्याची ही स्थिती असताना कारखानदार आणि नाणे उत्पादक यांच्याकडून मागणी वाढल्याने चांदीही २४०० रुपयांनी वधारल्याने ४०,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीने एकाच दिवसात गेल्या पावणेतीन वर्षात प्रथमच एवढी मोठी झेप घेतली आहे. गेल्या १९ महिन्यातील चांदीचा हा सर्वोच्च स्तर आहे. सराफा व्यापाऱ्यांचा संप समाप्त झाल्यापासून गेल्या सात दिवसांत चांदीच्या भावात ४१०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचा भावही गेल्या २३ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे.