Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने स्थिर; चांदीचे भाव वाढले

By admin | Updated: November 20, 2014 01:29 IST

जागतिक बाजारात नरमाईचा कल असल्यामुळे बुधवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात नरमाईचा कल असल्यामुळे बुधवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला. नव्या खरेदीचे बळ मिळाल्यामुळे चांदीचा भाव मात्र ४८५ रुपयांनी वाढला. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांच्याकडून सराफा बाजारात तुरळक प्रमाणात खरेदी झाली. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचा भाव उठू शकला नाही. तो २६,८00 रुपये तोळा या पातळीवर कायम राहिला. चांदीला मात्र औद्योगिक क्षेत्राकडून मागणी आली. त्याचा परिणाम म्हणून चांदीचा भाव ४८५ रुपयांनी वाढून ३६,३00 रुपये किलो झाला. जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात मंदीची चाल दिसून आली. सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव 0.३ टक्क्यांनी कोसळून प्रति औंस १,१९४.१0 डॉलर झाला. डॉलर मजबूत झाल्याचा हा परिणाम आहे. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव अनुक्रमे २६,८00 रुपये आणि २६,६00 रुपये असा कायम राहिला. सोन्याच्या ८ ग्राम गिन्नीचा भावही २३,८00 रुपये असा कायम राहिला. तयार चांदीचा भाव ४८५ रुपयांनी वाढून ३६,३00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र ३८0 रुपयांनी कोसळून ३५,८७0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६0 हजार रुपये शेकडा आणि विक्रीसाठी ६१ हजार रुपये शेकडा असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)