नवी दिल्ली : सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव २०० रुपयांनी घटून २८,१०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या कमजोर मागणीने चांदीचा भावही १,५५० रुपयांनी घसरून ३७,५५० रुपये प्रतिकिलो झाला. बाजार जाणकारांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर स्थानिक सराफ्यात आभूषण विक्रेत्यांची मागणी घटली असतानाच जागतिक बाजारातही कमजोर कल राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्यात २०० रुपयांनी, तर चांदीत १,५५० रुपयांनी घट
By admin | Updated: January 31, 2015 02:20 IST