Join us

जागतिक बाजारातील घसरणीने सोन्या-चांदीच्या भावात घट

By admin | Updated: May 8, 2015 01:00 IST

जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजधानी नवी दिल्लीच्या सराफ्यात घट नोंदली गेली. सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याचा

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजधानी नवी दिल्लीच्या सराफ्यात घट नोंदली गेली. सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याचा भाव १२० रुपयांनी घटून २७,२३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीचा कल आणि आभूषण निर्मात्यांची मागणी कमी झाल्याने ही घट नोंदली गेली. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांची खरेदी घटल्याने चांदीचा भावही १५० रुपयांनी कोसळून ३७,८५० रुपये प्रतिकिलो झाला.व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात मंदीचा कल राहिला. यामुळे सध्याच्या पातळीवरून आभूषण निर्माते आणि किरकोळ व्यापाऱ्यांची मागणी घटली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी घटून १,१८६.८४ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही ०.२ टक्क्यांनी कमी होऊन १६.४७ डॉलर प्रतिऔंस राहिला. तयार चांदीचा भाव १५० रुपयांनी कमी होऊन ३७,८५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १२५ रुपयांच्या घसरणीसह ३८,०१५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये आणि विक्रीकरिता ५७,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)