Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदीत आणखी घसरण

By admin | Updated: January 16, 2016 02:19 IST

सराफांकडून कमी मागणी आणि जागतिक बाजारातील प्रतिकूल परिस्थिती यामुळे शुक्रवारी सोने ४0 रुपयांनी घसरून २६,२१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोन्याप्रमाणेच चांदीही २३0

नवी दिल्ली : सराफांकडून कमी मागणी आणि जागतिक बाजारातील प्रतिकूल परिस्थिती यामुळे शुक्रवारी सोने ४0 रुपयांनी घसरून २६,२१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोन्याप्रमाणेच चांदीही २३0 रुपयांनी घसरून ३३,७९५ रुपये प्रतिकिलो झाली.जागतिक बाजारात आज सोन्याला मागणी नव्हती. त्याचा परिणाम येथील सराफांवर झाला. कारखानदार आणि नाणे उत्पादकांकडूनही उठाव नसल्याने चांदीचे भाव घसरले. जागतिक बाजारात सोने 0.२ टक्क्यांनी घसरून सिंगापुरात ते १,0७६.३६ अमेरिकी डॉलर प्रतिऔंस झाले, तर न्यूयॉर्क येथे सोन्याचे भाव १.३७ टक्क्यांनी घसरून १,0७८.५0 अमेरिकी डॉलर प्रतिऔंस झाले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव ४0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २६,२१0 रुपये आणि २६,0६0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. गुरुवारी सोने १९0 रुपयांनी वधारले होते. नाणे उत्पादक आणि कारखानदार यांच्याकडून मागणी नसल्याने चांदीचे भाव २३0 रुपयांनी घसरून ३३,७९५ रुपये प्रतिकिलो झाले. पण चांदीच्या नाण्याचे भाव स्थिर राहिले. गुरुवारी १00 नाण्यांच्या खरेदीचा दर ४८ हजार रुपये, तर विक्रीचा दर ४९ हजार रुपये होता. तोच दर शुक्रवारीही कायम राहिला.