Join us

जागतिक तेजीमुळे सोने-चांदी वधारले

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोने १० गॅ्रममागे २१० रुपयांनी वधारून २५,५६० रुपये झाले. चांदीचा भावही किलोमागे ४०० रुपयांनी वाढून ३४,१०० रुपये झाला.

नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोने १० गॅ्रममागे २१० रुपयांनी वधारून २५,५६० रुपये झाले. चांदीचा भावही किलोमागे ४०० रुपयांनी वाढून ३४,१०० रुपये झाला.जागतिक बाजारातील तेजी आणि लग्नसराईमुळे देशातील दागिने निर्मात्यांकडून वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या भावाची घसरण काहीशी थांबली. रुपयाच्या तुलनेत डॉलर स्वस्त झाल्यामुळे आयात महागली व त्यामुळे सोन्याचा भाव उजळला. औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीही उजळली.अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये रोजगाराची संधी वाढल्याचा अहवाल जाहीर होणार असून, त्यात अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे धोरण काय असेल याचे संकेत त्यातून मिळू शकत असल्यामुळे सोन्याचे भाव वाढले, असे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सिंगापूरच्या बाजारात औंसमागे सोने ०.३ टक्क्याने वाढून १,०६५.१२ अमेरिकन डॉलर झाले, तर गुरुवारी न्यूयॉर्कच्या बाजारात औंसमागे ०.८० टक्क्याने वाढून १,०६१.६० अमेरिकन डॉलर झाले. दिल्लीत तयार चांदी किलोमागे ४०० रुपयांनी वधारून ३४,१०० आणि वीकली बेसड् डिलेव्हरीची चांदी ३६० रुपयांनी ३३,६०० रुपयांवर गेली. चांदीच्या १०० नाण्यांचा खरेदीचा भाव ४८,००० व विक्रीचा भाव ४९,००० रुपये होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने २० गॅ्रममागे २१० रुपयांनी वाढून अनुक्रमे २५,५६० आणि २५,४१० रुपये झाले. गेल्या दोन दिवसांत सोने १० ग्रॅममागे ३५० रुपयांनी खाली आले होते. आठ ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्याचा भाव २२,२०० रुपये असा स्थिर होता.