Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदी तेजीत

By admin | Updated: July 23, 2016 05:09 IST

येथील सराफा बाजारात सोने १२0 रुपयांनी वाढून ३0,७७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले, तर चांदी ४६ हजारांच्या वर गेली.

नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोने १२0 रुपयांनी वाढून ३0,७७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले, तर चांदी ४६ हजारांच्या वर गेली.जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारातील खरेदी यामुळे शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, काल न्यूयॉर्क येथील बाजारात सोने १.१७ टक्क्याने वाढून १,३३0.७0 डॉलर प्रति औंस, तर चांदी १.८८ टक्क्याने वाढून १९.७४ डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १२0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,७७0 रुपये आणि ३0,६२0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,४00 रुपये असा स्थिर राहिला. तयार चांदीचा भाव ५00 रुपयांनी वाढून ४६,२00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ७१५ रुपयांनी वाढून ४६,४६0 रुपये किलो झाला.