Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने १५ रुपयांनी स्वस्त, चांदी १०० रुपये वधारली

By admin | Updated: September 21, 2015 22:54 IST

सराफांकडून कमी झालेली मागणी आणि जागतिक पातळीवरील सुस्तीमुळे सोने सोमवारी १० ग्रॅममागे १५ रुपयांनी स्वस्त होऊन २६,६६० रुपयांवर आले

नवी दिल्ली : सराफांकडून कमी झालेली मागणी आणि जागतिक पातळीवरील सुस्तीमुळे सोने सोमवारी १० ग्रॅममागे १५ रुपयांनी स्वस्त होऊन २६,६६० रुपयांवर आले. चांदीचा भाव मात्र किलोमागे १०० रुपयांनी वधारून ३६,००० रुपयांवर पोहोचला.सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदरात वाढ करील असे बँकेच्या धोरणकर्त्यांनी सूचित केले होते, त्यामुळे सोन्याला मागणी आली नाही. सराफांकडून आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी न आल्यामुळे त्याचा थेट परिणाम किमतीवर झाला. सिंगापूरच्या बाजारात सोन्याचा भाव औंसमागे ०.३ टक्क्यांनी खाली येऊन १,१३६ अमेरिकन डॉलरवर आला. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १५ रुपयांनी खाली येऊन अनुक्रमे २६,६६० व २५,५१० रुपये झाला. गेल्या शनिवारी सोने ७५ रुपयांनी वधारले होते.