Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीही चकाकली

By admin | Updated: September 18, 2015 00:31 IST

सलग दोन दिवसांची घसरण रोखत सोन्याने गुरुवारी पुन्हा झळाळी प्राप्त केली. चांदीच्या भावातही याच काळात जबरदस्त वाढ झाली.

नवी दिल्ली : सलग दोन दिवसांची घसरण रोखत सोन्याने गुरुवारी पुन्हा झळाळी प्राप्त केली. चांदीच्या भावातही याच काळात जबरदस्त वाढ झाली.जागतिक तसेच स्थानिक बाजारात व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून मागणी वाढल्याने सोने १० ग्रॅममागे २७५ रुपयांनी वधारून २६,६०० रुपये झाले, तर औद्योगिक कारखाने आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदी किलोमागे एक हजार रुपयांनी वधारून ३५,७०० रुपये असा दर गाठला.जागतिक बाजाराचा विचार करता सोन्याचे भाव ०.२ टक्क्यांनी वाढून १,१२१.३४ औंस असा झाला. त्यातच आगामी लग्नाचा हंगाम ध्यानात घेऊन देशात व्यापाऱ्यांकडून सोन्याची मागणी वाढली. त्याचमुळे ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे दर दहा ग्रॅममागे २७५ रुपयांनी वधारून अनुक्रमे २६,६०० आणि २६,४५० रुपये झाले.चांदीच्या नाण्याचा भावही वाढला. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ५१ हजार रुपये तर विक्रीचा ५० हजार रुपये झाला.