Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याला पुन्हा तेजीची झळाळी; चांदीत घसरण

By admin | Updated: March 10, 2015 00:02 IST

सोन्याचा भाव सोमवारी ८५ रुपयांच्या सुधारणेसह २६,६२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सराफा

नवी दिल्ली : सोन्याचा भाव सोमवारी ८५ रुपयांच्या सुधारणेसह २६,६२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सराफा व्यापारी व आभूषण निर्माते यांच्या मागणीत वाढ नोंदली गेली आहे. तथापि, चांदीचा भाव १०० रुपयांनी घसरून ३६,२०० रुपये प्रतिकिलो राहिला. सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर आभूषण निर्मात्यांकडून जोरदार खरेदी झाली. जागतिक बाजारातही तेजीचा कल होता. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.४ टक्क्यांनी वाढून १,१७२.४५ डॉलर प्रतिऔंस झाला. तयार चांदीचा भाव १०० रुपयांनी घसरून ३६,२०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३६,००० रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला. तथापि, चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी वधारून खरेदीकरिता ५६,००० रुपये व विक्रीसाठी ५७,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)