Join us  

सोन्याचा दर ४१,७00 रुपये; पेट्रोल-डिझेलही महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 6:27 AM

अमेरिकेने इराक व ईराणविरुद्ध युद्धाची धमकीने सोमवारी शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८९ अंकांनी तर निफ्टी २३३ अंकांनी आपटला.

मुंबई : अमेरिकेने इराक व ईराणविरुद्ध युद्धाची धमकीने सोमवारी शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८९ अंकांनी तर निफ्टी २३३ अंकांनी आपटला. त्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल ३ लाख कोटींचा फटका बसला. डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी घसरला आणि एक डॉलरची किंमत ७१.९३ रुपये झाली. शुक्रवारी रुपया ७१.८0 वर बंद झाला होता. सोनेही ७२0 रुपयांनी वाढून प्रति १0 ग्रॅम ४१,७३0 रुपये झाले. हा सोन्याचा आजवरचा सार्वकालिक उच्चांक ठरला. चांदीही १,१0५ रुपयांनी वाढून ४९,४३0 रुपये किलो झाली. जागतिक बाजारातही तेजीचा कल राहिला. अमेरिका-इराण प्रत्यक्ष युद्ध झाल्यास पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊन कच्च्या तेलांच्या किमती सध्याच्या ७२ डॉलर्स/बॅरलवरून ८० डॉलरहून अधिक होण्याची भीती आहे. त्याचे विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर होतील, असे सांगण्यात येते.>मुंबईत सोमवारी पेट्रोलचा दर एका लीटरला ८१ रुपये ५८ पैसे होता, तर डिझेलसाठी एका लीटरला ७२ रुपये 0२ पैसे मोजावे लागले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलाचे दर कमी वा स्थिर होईपर्यंत पेट्रोल व डिझेलची दरवाढ होतच राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातही डिझेलची दरवाढ अधिक असू शकेल, असे सांगण्यात येते.

टॅग्स :पेट्रोल