Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा भाव स्थिर, चांदी तेजीत

By admin | Updated: January 15, 2015 06:07 IST

दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी पाठ फिरविल्यामुळे सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोन्याचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला.

नवी दिल्ली : दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी पाठ फिरविल्यामुळे सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोन्याचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला. चांदीच्या भावात मात्र ३५0 रुपयांची वाढ झाली.राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात ३५0 रुपयांच्या वाढीसह चांदीचा भाव ३७,८00 रुपये किलो झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धता आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव अनुक्रमे २७,५५0 रुपये आणि २७,३५0 रुपये तोळा असा राहिला. सोन्याच्या ८ ग्रामच्या गिन्नीचा भाव मात्र ५0 रुपयांनी वाढून २३,८५0 रुपये झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १४0 रुपयांनी वाढून ३७,५३0 रुपये किलो झाला.