Join us

२०० रुपयांनी उतरला सोन्याचा भाव

By admin | Updated: February 12, 2015 23:36 IST

लग्नसराईच्या हंगामात गुरुवारीही सोन्याच्या भावात घसरणीचा कल राहिल्याने ग्राहकांना आणखी दिलासा मिळाला

नवी दिल्ली : लग्नसराईच्या हंगामात गुरुवारीही सोन्याच्या भावात घसरणीचा कल राहिल्याने ग्राहकांना आणखी दिलासा मिळाला. आज सोन्याचा भाव २०० रुपयांनी कोसळून २७,६३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात हा कल नोंदला गेला आहे.दिल्ली सराफ्यात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २०० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,६३० रुपये व २७,४३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही ५० रुपयांनी स्वस्त होऊन २३,७५० रुपयांवर आला.तयार चांदीचा भाव ४५० रुपयांनी कमी होऊन ३७,६५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४७५ रुपयांनी घटून ३७,१८० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)