Join us

लग्नसराईमुळे सोने तेजीत

By admin | Updated: May 1, 2015 23:46 IST

लग्नसराईच्या खरेदीने सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. गुरुवारी सोन्याचा भाव

नवी दिल्ली : लग्नसराईच्या खरेदीने सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. गुरुवारी सोन्याचा भाव ५५ रुपयांनी वधारून तीन महिन्यांचा उच्चांक २७,४७५ रुपये प्रति १० ग्र्रॅम झाला. लग्नसराईच्या खरेदीने बाजारात ही तेजी दिसून आली. चांदीचा भाव २०० रुपयांनी कोसळून ३७,४०० रुपये प्रतिकिलो झाला. सध्या लग्नसराई सुरू असून जोरदार खरेदी सुरू आहे. दुसरीकडे जागतिक बाजारातील तेजीचेही यास बळ मिळाले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात महागली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सराफ्यात योगदान दिले. लंडन येथे सोन्याचा भाव ०.१७ टक्क्यांनी उंचावून १,२०६.६० डॉलर प्रतिऔंस आणि चांदी ०.५७ टक्क्यांनी वधारून १६.६३ डॉलर प्रतिऔंस राहिला. दुसरीकडे तयार चांदीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे २०० रुपयांनी कोसळून ३७,४०० रुपये, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १७० रुपयांनी वाढून ३७,४६० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरता ५६,००० रुपये आणि ५७,००० रुपये प्रतिशेकडा राहिला.