Join us

सणासुदीच्या खरेदीने सोन्याच्या भावात तेजी

By admin | Updated: August 13, 2014 03:54 IST

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर व्यापाऱ्यांकडून सणासुदीची खरेदी झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोने- चांदीच्या भावात सुधारणा नोंदली गेली

नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर व्यापाऱ्यांकडून सणासुदीची खरेदी झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोने- चांदीच्या भावात सुधारणा नोंदली गेली. सोन्याचा भाव २५ रुपयांनी वधारून २८,७५० रुपये प्रति दहाग्रॅम झाला. चांदीचा भावही २७५ रुपयांनी उंचावून ४४,२७५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.युक्रेनमधील तणावाचा बाजारावर दबाव आहे. परिणामी, जागतिक बाजारात गुंतवणूकदारांनी सराफा बाजाराला प्राधान्य दिले. या पार्श्वभूमीवर देशी बाजारातही सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी या मौल्यवान धातूंची खरेदी झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)