Join us  

दहा दिवसात सोन्याच्या दरात ८०० तर चांदीत १५०० रुपयांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:08 PM

तुलसी विवाह होताच सुवर्ण खरेदीला वेग

जळगाव : तुलसी विवाह होताच लग्नसराईची लगबग सुरू झाली तशी सोने-चांदीच्या खरेदीला पुन्हा एकदा वेग आला आहे. दरम्यान, गेल्या १० दिवसात सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ््याने कमी झाले आहेत. सोने ३९ हजार १०० रुपये प्रती तोळ््यावरून ३८ हजार ३०० रुपयांवर आले आहेत. तसेच चांदीचेही भाव ४६ हजार ५०० रुपये प्रती किलोवरून ४५ हजार रुपये प्रती किलोवर आले आहेत.दरवर्षी लग्नसराई संपल्यानंतर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोने-चांदी खरेदी कमी होऊन भावही गडगडतात. मात्र यंदाचे वर्ष यास अपवाद ठरले. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यापासून कधी नव्हे एवढे भाव वाढून खरेदीचाही उत्साह राहिला. त्यात नवरात्रोत्सवापासून सोने-चांदी खरेदीला अधिक वेग आला. दिवाळीमध्ये प्रत्येक मुहूर्तावर सोने खरेदीसाठी गर्दी होती. या काळात येथे १५० फर्ममध्ये ६५ कोटींची झाली. लक्ष्मीपूजनापर्यंत मोठी खरेदी झाल्यानंतर पाडवा व भाऊबीजेलाही सराफ दुकानांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी होऊन ती आठवडाभर कायम राहिली. त्यानंतर केवळ एक आठवड्याचा खंड पडल्यानंतर पुन्हा एकदा खरेदीला वेग आला आहे.९ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाहास सुरुवात झाल्याने सर्वत्र आता ‘लगीन घाई’ सुरू होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी केली जात आहे. विवाह तिथी जवळ आल्यानंतर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने अनेक जण अगोदरच दागिन्यांची खरेदी करून ठेवत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.भावात घसरणसध्या अमेरिकन डॉलरचे दर वाढले असले तरी सोन्या-चांदीच्या भावात घसरण होत आहे. २ नोव्हेंबर रोजी अमेरिकन डॉलरचा दर ७०.५२ रुपये असताना त्या दिवशी सोन्याचे भाव ३९ हजार १०० रुपये प्रती तोळा होते तर चांदीचे भाव ४६ हजार ५०० रुपये प्रती किलो होते. मात्र त्यानंतर डॉलरचे भाव वाढत जाऊन १२ नोव्हेंबरला ते ७१.७४ रुपयांवर पोहचले. यात सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ््याने कमी होऊन ते ३८ हजार ३०० रुपयांवर तर चांदीचे भाव दीड हजार रुपये प्रती किलोने कमी होऊन ते ४५ हजार रुपये प्रती किलोवर आले आहेत.खऱ्या अर्थाने ‘सुवर्ण’ वर्षयंदा कधी नव्हे एवढी वाढ सोन्याच्या भावात झाली. तरीदेखील सुवर्ण खरेदीचा उत्साह कायम आहे. आॅगस्ट व सप्टेंबर या मागणी घटणाºया काळातही मागणी कायम राहत नवरात्रोत्सवापासून ते थेट दीपावली पर्वापर्यंत खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. भाऊबीजला सोन्याचे भाव ३८ हजार ६०० रुपये प्रती तोळा तर चांदीचे भाव ४७ हजार रुपये प्रती किलो होते. त्या वेळी दररोज गर्दी कायम असल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय रुपयात घसरण झाल्याने सोन्याचे भाव दोन दिवसात ५०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३८ हजार ६०० रुपयांवरून ३९ हजार १०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. चांदीच्या भावात मात्र ५०० रुपये प्रती किलोने घसरण होऊन ते ४७ हजार रुपयांवरून ४६ हजार ५०० रुपयांवर आले होते. त्या वेळी सोन्याचे भाव वाढले तरी खरेदीचा उत्साह कायम राहिला. सोन्यामध्ये गुंतवणूक वाढविण्याच्या विचाराने ग्राहक सोने खरेदीकडे वळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे नोटाबंदीनंतर सोन्याची सर्वाधिक खरेदी यंदा होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. परिणामी यंदाचे हे वर्ष खºया अर्थाने ‘सुवर्ण’ वर्ष असल्याचे सांगितले जात आहे.लग्नसराई सुरू होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीची मागणी वाढली आहे. तसेच पावसाने विश्रांती घेतल्याने खरेदीला वेग आला आहे.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :व्यवसायजळगाव