Join us

सोन्यात घट; चांदी तेजीत

By admin | Updated: December 23, 2014 00:26 IST

आठवड्याच्या प्रारंभी सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात संमिश्र कल नोंदला गेला. जागतिक बाजारात तेजी असताना दिल्लीत सोन्याचा

नवी दिल्ली : आठवड्याच्या प्रारंभी सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात संमिश्र कल नोंदला गेला. जागतिक बाजारात तेजी असताना दिल्लीत सोन्याचा भाव मागणीअभावी ४५ रुपयांनी घसरून २७,२६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. दुसरीकडे चांदीचा भाव ताज्या खरेदीमुळे ७६० रुपयांनी वधारून ३६,९०० रुपये प्रतिकिलो झाला.ज्वेलर्स व किरकोळ विक्रेत्यांची मागणी घटल्याने सोन्याच्या भावात ही घसरण नोंदली गेली आहे. तथापि, जागतिक बाजारात तेजीचा कल राहिल्याने घसरणीला काहीसा लगाम बसला. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी वधारून १,१९९.६५ डॉलर प्रतिऔंस राहिला. तयार चांदीचा भाव ७६० रुपयांच्या तेजीसह ३६,९०० रुपये प्रतिकिलो झाला. चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १५ रुपयांनी कमी होऊन ३६,९२५ रुपयांवर आला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ५९,००० रुपये व विक्रीसाठी ६०,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)