Join us

सोन्याच्या भावात २५० रुपयांनी घट

By admin | Updated: March 4, 2015 00:00 IST

जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव २५० रुपयांनी घटून २७,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव २५० रुपयांनी घटून २७,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. चांदीचा भावही ६०० रुपयांनी कोसळून ३७,००० रुपये प्रतिकिलोराहिला.जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा भाव आठवड्याच्या नीचांकावर पोहोचला. दुसरीकडे अमेरिकी डॉलर १० वर्षांच्या उच्चांकावर राहिला. परिणामी स्थानिक सराफ्यात घसरणीचा कल नोंदला गेला आहे.सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.९ टक्क्यांनी घटून १,१९५.५० डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या २४ फेब्रुवारीची ही नीचांकी पातळी आहे. दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २५० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,०५० रुपये व २६,८५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला. गेल्या दोन सत्रांत यात ३०० रुपयांची वाढ नोंदली गेली होती. तयार चांदीचा भाव ६०० रुपयांनी घसरून ३७,००० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३८५ रुपयांनी घटून ३६,७०० रुपये प्र्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे खरेदीकरिता ५९,००० रुपये व विक्रीसाठी ६०,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)