Join us

सोन्याच्या भावात झाली ११० रुपयांची घसरण

By admin | Updated: April 27, 2015 23:06 IST

जागतिक बाजारात तेजी असतानाच राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मात्र सोमवारी घसरणीचा कल दिसून आला. सोन्याचा भाव ११० रुपयांच्या घसरणीने २७,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात तेजी असतानाच राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मात्र सोमवारी घसरणीचा कल दिसून आला. सोन्याचा भाव ११० रुपयांच्या घसरणीने २७,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. तथापि, चांदीचा भाव १५० रुपयांच्या वाढीसह ३६,५०० रुपये प्रतिकिलोवर राहिला. बाजार सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या उच्च पातळीवर सोन्याच्या मागणीत घट झाली. दुसरीकडे जागतिक बाजारात तेजीचा कल राहिला. मर्यादित व्यवहारामुळे ही घसरण झाली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.४ टक्क्यांनी वधारून १,१८३.८३ डॉलर प्रतिऔंस राहिला. दुसरीकडे तयार चांदीचा भाव १५० रुपयांनी वधारून ३६,५०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २३० रुपयांनी वाढून ३६,१८० रुपये प्रतिकिलोवर गेला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५५,००० रुपये आणि ५६,००० रुपये प्रतिशेकडा कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क) ४राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ११० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,०५० रुपये आणि २६,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. ४यात शनिवारी ३० रुपयांची घसरण नोंदली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला.