नवी दिल्ली : सोन्याचा भाव आणखी २५ रुपयांनी घसरून २७,२२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीने स्थानिक सराफ्यात या मौल्यवान धातूची मागणी घटली. औद्योगिक संस्था व नाणेनिर्मात्यांकडून योग्य मागणी न मिळाल्याने चांदीचा भावही १०० रुपयांनी कमी होऊन ३६,६०० रुपये प्रतिकिलोवर आला.बाजार जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात घसरणीचा कल आहे. परिणाम सध्याच्या पातळीवरून आभूषण निर्माते व रिटेलर्सची मागणी घटल्याने सोन्याच्या भावात ही घसरण नोंदली गेली आहे.लंडन बाजारात सोन्याचा भाव ०.१६ टक्क्यांनी घटून ११९६.०० डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.तयार चांदीचा भाव १०० रुपयांनी घटून ३६,६०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १९० रुपयांनी कमी होऊन ३६,६१० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही १,००० रुपयांनी कमी होऊन खरेदीसाठी ६०,००० रुपये व विक्रीकरिता ६१,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावात आणखी घसरण
By admin | Updated: December 20, 2014 00:42 IST